बनावट धनादेश देऊन दीड कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST2021-03-08T04:14:59+5:302021-03-08T04:14:59+5:30

सुधीर गंगाभिसन कलंत्री (वय ५६,रा. कलंत्री चेंबर, नेहरू चौक) यांनी फिर्याद दिली. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रत्येकी ५० लाखांची फसवणूक ...

Fraud of Rs 1.5 crore by giving fake checks | बनावट धनादेश देऊन दीड कोटींची फसवणूक

बनावट धनादेश देऊन दीड कोटींची फसवणूक

सुधीर गंगाभिसन कलंत्री (वय ५६,रा. कलंत्री चेंबर, नेहरू चौक) यांनी फिर्याद दिली. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रत्येकी ५० लाखांची फसवणूक झाली. २०१७ पासून ११ फेब्रुवारी २०२१ पावेतो ही घटना घडली. आसिफ मसूद आतिक अहमद याने यंत्रमागासाठी लागणारे सूत फिर्यादीकडून दोन वर्षे वेळेत पैसेे देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. २०१७ पासून वेळोवेळी दिलेल्या मालाचे देय रकमेपोटी ११ फेब्रुवारी २०२१ रोजी बँकेचा धनादेश दिला. बँकेच्या खात्यात पुरेशी रक्कम न ठेवता धनादेश वटणार नाही, याची जाणीव व माहिती असताना फिर्यादीकडून सूतमाल घेतला. ४० लाखांचा बनावट धनादेश देऊन फसवणूक केली म्हणून प्रो. मे. सुपर फॅब्रिक्स टेक्सटाइल्स आसिफ मसूद अतिक अहमद गट नं. ४२ प्लॉट नं. ४६, म्हाळदे शिवार याच्याविराेधात फिर्याद दिली, तर दुसऱ्या घटनेत प्राे. मे. ओवेस टेक्सटाइल्स नाहीदा कौसर मोहंमद अजहर स.नं. २०१, सनाउल्लाह नगर आणि प्रो. मे.ए. आर. टेक्सटाइल्स मोहंमद अजहर हाजी रेहमतुल्लाह सर्व्हे नं. २०३, सनाउल्लाह नगर या दोघांनीही प्रत्येकी ५० लाखांचे बनावट धनादेश देऊन फसवणूक केली. तिघांविरोधात आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक माने करीत आहेत.

Web Title: Fraud of Rs 1.5 crore by giving fake checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.