अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:16 IST2021-04-28T04:16:27+5:302021-04-28T04:16:27+5:30
कौळाणे येथील पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि.२७) याप्रकरणी फिर्याद दिली. २२ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दादाजी ऊर्फ ...

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत फसवणूक
कौळाणे येथील पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि.२७) याप्रकरणी फिर्याद दिली. २२ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दादाजी ऊर्फ पिंटू सुखदेव बच्छाव रा. चिंचावड यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने तिचा भाऊ दादाजी बच्छाव यांच्याकडे विश्वासाने आपल्या अल्पवयीन मुलीला शिक्षणासाठी पाठविले होते. त्याने फिर्यादीचा विश्वासघात करून या अल्पवयीन मुलीचे लग्न वैभव ज्ञानेश्वर निकम याच्याबरोबर लावून दिले होते. याकामी दादाजी बच्छाव यास नवरदेवाचे वडील ज्ञानेश्वर तुकाराम निकम, नवरदेवाची आई (नाव माहीत नाही), पुरोहित राजेंद्र विठ्ठल कुलकर्णी आणि नवरदेवाचा मित्र (नाव माहीत नाही) यांनी मदत करून अल्पवयीन मुलीचा लग्नविधी करून फिर्यादीची फसवणूक केली. त्यानुसार तक्रारीवरून गुन्हा दाखल आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.