पुण्यातील व्यावसायिकाची फसवणूक

By Admin | Updated: October 10, 2015 23:29 IST2015-10-10T23:28:20+5:302015-10-10T23:29:37+5:30

इगतपुरी : संशयित महादेव केकाणला १३ पर्र्यंत पोलीस कोठडी

Fraud fraud in Pune | पुण्यातील व्यावसायिकाची फसवणूक

पुण्यातील व्यावसायिकाची फसवणूक

घोटी : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची इगतपुरी शहरातील संशयिताने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्र ार इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित महादेव केकाण यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत (दि. १३) पोलीस कोठडी सुनावली.
इगतपुरी येथील कृषी संशोधन केंद्रात कृषी सहायक पदावर वर्षापूर्वी कार्यरत असलेले महादेव परमेश्वर केकाण यांनी तुषार गडाळे (राहणार ५३८, रविवार पेठ, सोन्या मारुती चौक, पुणे) यांच्या सोबत गडाळे यांचा मित्र नदीम मुजावर यांच्या मध्यस्थीने एप्रिल २०१४ मध्ये इगतपुरीतील एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. मुजावर याने केकाण यांची एका जमीन खरेदी - विक्री व्यवसाय करणारा एजंट म्हणून ओळख करून दिली होती. गडाळे यांना महादेव केकाण यांनी तुम्हाला नाशिक येथे स्वस्तात जमीन व बंगला घेऊन देतो, असे सांगून माझ्या नावाचा नाशिक येथील बंगला व जमीन विक्री करायची असल्याचे सांगितले. जमीन रास्त किमतीत देतो, त्यासाठी मला पाच कोटी रु पये द्या, अशी मागणी केकाण याने गडाळे यांच्याकडे केली होती. मात्र गडाळे यांनी स्पष्ट नकार दिला. दरम्यान, केकाण यांनी संबंधितांना विश्वासात घेतल्यानंतर गडाळे यांनी केकाण यांच्यावर विश्वास दाखवत २८ एप्रिल २०१४ रोजी आरटीजीएसद्वारे पुणे येथील स्टेट बँकेतून केकाण यांची पत्नी मनीषा केकाण यांच्या इगतपुरी येथील आयसीआयसीआय बँकेच्या १४६९०१५०१७२४ या खाते क्रमांकावर एक कोटी रुपये जमा केले. रक्कम दिल्यानंतर गडाळे यांनी केकाण यांच्याकडे जमिनीविषयी पाठपुरावा केला असता, ते टाळाटाळ करू लागले. दरम्यान, ८ डिसेंबर २०१४ रोजी गडाळे यांनी केकाण यांना भ्रमनध्वनीवर रकमेची मागणी केली असता, केकाण यांनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गडाळे यांनी केकाण यांच्या विरोधात पुणे सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली होती.जिल्ह्यातील अनेक व्यापारी व सरकारी आधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालून महादेव केकाण याने फसविले आहे, अशी चर्चा इगतपुरी शहरात होती. (वार्ताहर)

Web Title: Fraud fraud in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.