एटीएम’कार्डद्वारे वृद्धाची फसवणूक
By Admin | Updated: February 9, 2016 23:37 IST2016-02-09T23:32:30+5:302016-02-09T23:37:58+5:30
एटीएम’कार्डद्वारे वृद्धाची फसवणूक

एटीएम’कार्डद्वारे वृद्धाची फसवणूक
नाशिक : एटीएममधून पैसे काढणाऱ्या वृद्धाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्यानंतर हातचलाखीने एटीएम कार्ड घेऊन चौघा भामट्यांनी खात्यातील पैसे काढून घेतल्याची घटना घडली आहे़
मोटवाणी रोडवरील मैत्रेय बंगल्यातील रहिवासी सुभाष पाटील (६९) हे दुर्गा गार्डनसमोरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात होते़ २६ डिसेंबर २०१५ ते २ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत एटीएममधून पैसे काढत असताना चौघा भामट्यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करून पिन नंबर माहिती करून घेतला़ यानंतर हातचलाखीने एटीएम कार्ड घेऊन त्यांच्या खात्यातील ५४ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली़ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)