महिला पोलीस शिपायाची फसवणूक

By Admin | Updated: October 14, 2014 01:23 IST2014-10-14T00:31:14+5:302014-10-14T01:23:40+5:30

महिला पोलीस शिपायाची फसवणूक

Fraud of a female police force | महिला पोलीस शिपायाची फसवणूक

महिला पोलीस शिपायाची फसवणूक


नाशिक : पोलीस शिपाई महिलेस बँक खाते नंबर व पिनकोड बदलल्याचे कारण सांगून पिनकोड विचारून घेत खात्यावरील रक्कम इंटरनेटवरून परस्पर ट्रान्स्फर केल्याप्रकरणी दोघांवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आडगावच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या नवप्रशिक्षित प्रतिभा दत्तात्रेय आहेर (१९) यांचे अ‍ॅक्सिस बँकेत खाते आहे़ त्यांना शुक्रवारी एका महिलेने ९९३९३६४२३६ या मोबाइल क्रमांकावरून फोन करून जुना खाते नंबर व पिनकोड देण्यास सांगण्यात आले. आहेर यांनी माहिती देताच काही वेळातच त्यांच्या बँकेच्या अकाउंटवरून २३ हजार ४९९ रुपये इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केल्याचा संदेश मोबाइलवर आला़ फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रतिभा आहेर यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़

Web Title: Fraud of a female police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.