बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक
By Admin | Updated: December 5, 2015 23:41 IST2015-12-05T23:40:22+5:302015-12-05T23:41:47+5:30
बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक
नाशिक : सिलिंग कायद्यांतर्गत असलेली शेतजमीन सोडविणे व सिलिंग आदेश मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, तसेच जन्माच्या दाखल्यात खाडाखोड करून शासनासह जमीनमालकाची फसवणूक करणाऱ्या चौघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आडगाव परिसरातील रहिवासी सुदाम किसन मते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची २२ एकर शेतजमीन आहे. ती सिलिंग कायद्याखाली असून, संशयित तानाजी रघुनाथ मते व इतर तिघांनी स्वत:च्या फायद्यासाठी शासनाकडे शाळा सोडल्याचा दाखला व जन्माचा दाखला सादर केला़ त्यात खाडाखोड होती़ या दाखल्याच्या आधारे शासनाकडून सिलिंग आदेशही मिळविला़ यानंतर सुदाम मते यांचा या शेतजमिनीवर हक्क असतानाही खोटे वाटप पत्र करून संशयितांनी त्याद्वारे सातबाऱ्यावर स्वत:ची नावे लिहून साठेखत तयार करून घेत जमीन परस्पर नावावर केली. संशयित तानाजी मते व इतर तिघा संशयितांनी बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची व सुदाम मते यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़