बनावट पावत्या तयार करून फसवणूक

By Admin | Updated: December 3, 2015 23:11 IST2015-12-03T23:11:13+5:302015-12-03T23:11:56+5:30

पिंपळगाव : टोळी पोलिसांच्या ताब्यात

Fraud by creating fake receipts | बनावट पावत्या तयार करून फसवणूक

बनावट पावत्या तयार करून फसवणूक

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टमाटा आडत्यांच्या नावाने बनावट पावत्या तयार करून पैसे उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टमाटा विक्री झाल्यावर शेतकरीवर्गाला सौदापट्टी पावती मिळते. सदरचे पावती पुस्तक हे बाजार समिती आडतदाराना देत असते. आडतदार पावती पुस्तके टमाटा व्यापारीवर्गाला देत असते. व्यापारी टमाटा खाली केल्यानंतर शेतकऱ्यांना सौदापट्टी दिली जाते. या पट्टीवरून टमाटा आडतदार शेतकऱ्यांना पेमेंट देत असतात. मात्र महेश देशमुख (२६) लिंक रोड अंबड, सिडको, अरुण खांदवे (२८) पिंपळणारे, ता. दिंडोरी या दोन्ही तरुणांनी बाजार समितीमधील व्यवहाराची माहिती करून
घेतली.
सौदा पट्टीचे पुस्तक छापून बनावट शिक्के बनवून सौदापट्टी बनविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना ६४ कॅरेट ३५१ रुपये भावाने २२ हजार रुपये सद्गुरू व्हेजिटेबल कंपनीकडून घेतल्याने त्यांचा विश्वास पक्का झाला. दुसरी पावती बनविण्यापूर्वीच पकडले गेल्याने ११ आडत्यांची होणारी फसवणूक टळली आहे.
या दोघांनी नाशिक येथील अमित रामटेक, पाथर्डी फाटा,
शुभम निंबाळकर यांच्याकडे पावती पुस्तक व बनावट शिक्के बनविले होते.
पिंपळगाव पोलिसांनी भीमाशंकर व्हेजिटेबल कंपनी, अमर व्हेजिटेबल कंपनी, जय मल्हार व्हेजिटेबल कंपनी, मातोश्री व्हेजिटेबल कंपनी, दुर्गा व्हेजिटेबल कंपनी अशा वेगवेगळ्या कंपनीचे खासगी शिक्के बनविले होते. सदर आरोपीकडून चार सौदापट्टी पुस्तके, शिक्के, प्रिंटिंग साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी महेश देशमुख, अरुण खांदवे, अमित रामटेक,
शुभम निंंबाळकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून, त्यांची रवानगी नाशिक जेलमध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कटारे, हवालदार मुंडे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Fraud by creating fake receipts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.