शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ई-शॉपीतून कोट्यवधींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:03 IST

हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर २० लाख रुपयांपर्यंतचा परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिक विभागातील हजारो गुंतवणूकदारांची ई-शॉपीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली आहे़

नाशिक : हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर २० लाख रुपयांपर्यंतचा परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिक विभागातील हजारो गुंतवणूकदारांची ई-शॉपीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली आहे़ कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, सागर नांद्रे, सुधाकर घोटेकर, दिनेश बाविस्कर, रवि त्रिपाठी यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी सोमवारी (दि़ २०) रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़  इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात काही महिन्यांपूर्वी संचालक ज्ञानेश्वर पाटील याने ई-शॉपी नावाने कंपनी सुरू केली़  या कंपनीत काही हजार रुपयांची गुुंतवणूक केल्यानंतर वीस लाख रुपयांचा परतावा मिळणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते़ त्यामुळे केवळ नाशिक शहरातीलच नव्हे तर धुळे, जळगाव, नंदुरबार यांसह विविध जिल्ह्णांतील गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतविण्यास सुरुवात केली. कंपनीविषयी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी शहरातील काही भागात गृहोपयोगी वस्तूंचे मॉलही उभारण्यात आले़ मात्र, गत काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना परतावा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या़ई-शॉपीच्या संचालकाने कलानगर येथील कार्यालय बंद केल्यानंतर कंपनीने सुरू केलेल्या बापूबंगला येथील मॉलमध्ये गुंतवणूकदारांची गर्दी होऊ लागली. तसेच कंपनीकडून सर्वांचे पैसे दिले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात येत होते मात्र, अनेक महिने होऊनही तसेच गुंतवलेल्या स्कीमची मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याचे गुंतवणूकदारांपैकी सुशील भालचंद्र पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून संचालकांच्या विरोधात तक्रार केली आहे़ पाटील यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.गुंतवणूकदारांनी संपर्क साधावाई-शॉपीमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ शहरातील ज्या गुंतवणूकदारांची ई-शॉपी कंपनीकडून फसवणूक झाली असेल त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा़- नारायण न्याहाळदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा