शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमीन व्यवहारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 01:09 IST

एकाच शेतजमिनीचे अनेकांना साठेखत करून लाखोंची फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली असून, या टोळीतील महिला व पुरुषाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांलाच फसविल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकास अटक केली असून, महिला मात्र फरार आहे.  

ठळक मुद्देटोळी सक्रिय : एकास अटक; महिला मात्र फरार 

नाशिक : एकाच शेतजमिनीचे अनेकांना साठेखत करून लाखोंची फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली असून, या टोळीतील महिला व पुरुषाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांलाच फसविल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकास अटक केली असून, महिला मात्र फरार आहे.  याबाबत महेश (सुनील) किसन वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोटी येथे राहाणारा सुरेश पांडुरंग नागरे याने  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड येथील सुमारे दीड हेक्टर जमीन विक्री करायची असल्याचे सांगून त्यापोटी एक लाख रुपये रोख घेतले. या जमिनीचा व्यवहार १३ लाख रुपयात ठरला. व्यवहार पूर्ण करून खरेदीखत करून देण्याचे ठरलेले असताना नागरे याने एक लाख रुपये घेतल्यानंतर खरेदी करून देण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र त्याचवेळी त्याची साथीदार असलेली सुरेखा शहा, रा. सातपूर हिच्याशी संगनमत करून सदर शेतजमिनीचे साठेखत शहा यांना करून दिले व वाजे यांची फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरेश नागरे यास अटक केली, त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, नागरेची साथीदार सुरेखा शाह ही फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. यांच्या संबंधित कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी