जिल्हा परिषदेच्या स्वच्छतागृहांची दुर्गंधी
By Admin | Updated: December 4, 2015 23:09 IST2015-12-04T23:09:03+5:302015-12-04T23:09:40+5:30
जिल्हा परिषदेच्या स्वच्छतागृहांची दुर्गंधी

जिल्हा परिषदेच्या स्वच्छतागृहांची दुर्गंधी
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या जुन्या इमारतीत या आठवड्यात पाणीपुरवठाच न झाल्याने स्वच्छतागृहांची साफसफाई रखडली असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याचा आरोप कर्मचारी वर्गातून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला करण्यात येणारा पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने पदाधिकाऱ्यांच्या कक्षात येणाऱ्या अभ्यागतांना पाणी देण्याचीही सोय परिचरांना उरलेली नाही. शुक्रवारी (दि. ४) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष कार्यालयात पाणीपुरवठा करण्यात आला. अन्यत्र मात्र पाण्याची ओरडच होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीलाच पाणीपुरवठा बंद झाल्याने तळमजल्यावर कृषी विभागाच्या बाहेरील स्वच्छतागृह, पदाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेरील स्वच्छतागृह, आरोग्य विभागाबाहेरील स्वच्छतागृह अशा सर्वच स्वच्छतागृहांची पाण्याअभावी साफसफाई न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांनाही ठरावीक विभागांसमोरून जाताना नाकाला रूमाल लावूनच बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्वच स्वच्छतागृहांची तातडीने स्वच्छता व साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी वर्गातून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)