अधिकाºयांच्या गाडीवर फेकला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:43 IST2017-09-02T00:43:38+5:302017-09-02T00:43:50+5:30
येथील प्रभाग क्रमांक २७ मधील सह्याद्रीनगर यासह परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षभरापासून दैनंदिन साफसफाई केली जात नसल्याने ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला आहे.

अधिकाºयांच्या गाडीवर फेकला कचरा
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २७ मधील सह्याद्रीनगर यासह परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षभरापासून दैनंदिन साफसफाई केली जात नसल्याने ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला आहे.
याबाबत अनेकदा तक्रार करूनही महानगरपालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने शुक्रवारी याठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना घेराव घालून त्यांना कचरा भेट देण्यात आला. तसेच त्यांच्या गाडीवरदेखील संतप्त महिला व नागरिकांनी कचरा टाकून प्रशासनाचा निषेध केला. सह्याद्रीनगर व परिसराची गेल्या वर्षभरापासून दैनंदिन साफसफाई केली जात नसून घंटागाडीदेखील नियमित येत नसल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक किरण गामणे यांच्याकडे तक्रार केली. गामणे यांनी महिलांना भेडसावणाºया या तक्रारीची दखल घेत मनपाच्या आरोग्य विभागाचे आरोग्याधिकारी बुकाने यांना याठिकाणी पाहणी करण्यासाठी बोलविले होते. यावेळी बुकाने येथे आल्यानंतर त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात करताच महिलांनी अधिकारी बुकाने यांना घेराव घातला. तसेच गेल्या वर्षभरापासून परिसरातील दैंनदिन कचरा साफ केला जात नसल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे सांगितले.