मेंढ्यांना चाऱ्याचा पाहुणचार
By Admin | Updated: June 28, 2016 22:08 IST2016-06-28T21:50:50+5:302016-06-28T22:08:00+5:30
साकूर : परजिल्ह्यातील मेंढपाळांना दाखविली शेतकऱ्याने माणुसकी

मेंढ्यांना चाऱ्याचा पाहुणचार
बेलगाव कुऱ्हे : आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होऊनदेखील इगतपुरी तालुक्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूर्व भागात कोरड्या दुष्काळामुळे चाराटंचाई निर्माण झाली असून परजिल्ह्यातून काही मेंढपाळांचे स्थलांतर ब्रिटिशकालीन दारणा धरण परिसरात झाले आहे; मात्र इकडेही दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्यांचेही डोळे आभाळाकडे लागले असून चाऱ्यासाठी मेंढपाळांची मोठी आबाळ झाली आहे. बागाईत क्षेत्राला पाणीच उपलब्ध नसल्याने मोठा फटका बसला असून पाण्याअभावी वांग्याची रोपे करपून गेली आहेत.
कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता आलेल्या परिस्थितीचा खंबीर सामना करीत साकूर, ता.(इगतपुरी) येथील शेतकरी सखाराम सहाणे यांनी माणुसकी दाखवित नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या मेंढ्यांना वांग्याच्या रोपांचा पाहुणचार दिला आहे. (वार्ताहर)
ं