अभियांत्रिकीसाठी साडेचार हजार अर्ज
By Admin | Updated: June 10, 2016 00:12 IST2016-06-09T23:11:12+5:302016-06-10T00:12:15+5:30
अभियांत्रिकीसाठी साडेचार हजार अर्ज

अभियांत्रिकीसाठी साडेचार हजार अर्ज
नाशिक : अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, फॅलिसिटेशन सेंटर्सही कार्यान्वित झाली आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी केली होती.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांनी येत्या १६ जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. १७ जून रोजी अर्जांची पडताळणी व प्रवेशअर्ज निश्चित केले जातील. १९ जून रोजी प्रारूप गुणवत्तायादी जाहीर होणार आहे, तर १९ ते २१ जून दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जांतील दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे. २२ जून रोजी अंतिम गुणवत्तायादी जाहीर होणार आहे.