अतिवृष्टी झाली तर चौदा भागांना धोका; पावसात या ठिकाणी न गेलेलेच बरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:07+5:302021-07-28T04:15:07+5:30
इन्फो.. शहरातील पाणी साचणारी ठिकाणे नाशिक शहरातील सराफ बाजार, गोविंद नगर, कर्मयोगी नगर, नाशिकरोड येथील नवले चाळ, वालदेवी नदी ...

अतिवृष्टी झाली तर चौदा भागांना धोका; पावसात या ठिकाणी न गेलेलेच बरे!
इन्फो..
शहरातील पाणी साचणारी ठिकाणे
नाशिक शहरातील सराफ बाजार, गोविंद नगर, कर्मयोगी नगर, नाशिकरोड येथील नवले चाळ, वालदेवी नदी काठी साठे नगर, नाशिक पश्चिम भागात शरणपूररोड, केटीएचएम कॉलेज, जोशी वाडा, मिलिंद नगर, आनंदवल्लीतील नवश्या गणपती परिसर, सिडकोत गणेश चौक, उपेंद्र नगर, सीटी सेंटर मॉल, खुटवड नगर परिसर, कामटवाडे, सातपूर येथील महादेव वाडी, पूर्व विभागात अशोका मार्ग, शिवाजी वाडी.
इन्फो..
पालिकेचे ते रडगाणे...
नाशिक महापालिकेने नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत सुमारे साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून पावसाळी गटार याेजना राबवली आहे. मात्र, त्यानंतरदेखील समस्या कायम आहे. मात्र, २००८ मध्ये त्यावेळी असलेल्या पर्जन्यमानाला अनुसरून योजना तयार करण्यात आली आहे. त्यात आता फरक पडला आहे. त्यामुळे पावसाळी गटारे अपुरी पडत आहे.
इन्फो..
पाणी साचण्याची कारणे
- शहराची भौगोलिक रचना काही ठिकाणी अडचणीची आहे. सराफ बाजार हा उताराचा भाग आहे. अशा प्रकारे सखल भाग असल्याने पाणी साचते.
- महापालिकेची पावसाळी गटार योजना अपुरी पडत आहे. शहरातील कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्याने पाणी वाहत जाते.
- शहरातील नाले बुजवणे आणि बंदिस्त करणे अडचणीचे ठरले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागच शिल्लक नाही.
- पावसाळी गटारात नाले, तसेच नाल्यांची पावसाळ्यापूर्वी न होणारी स्वच्छता यामुळेही वेगवेगळ्या भागात पाणी साचते.
इन्फो...
पाऊस नको नको सा...
कोट..
दरवर्षी पावसाळ्यात सराफ बाजार पाण्यात जातो. महापालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या पडल्याने गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सराफ बाजारात नुकसान झाले आहे. आता गावठाण योजनेत काही कामे केली जात आहेत. त्यामुळे थोडासा मिळाला आहे. मात्र, काम योग्य रीतीने पूर्ण झाले तरच दिलासा मिळेल.
- कृष्णा नागरे, सराफ व्यावसायिक
कोट..
दरवर्षी पावसाळ्यात खुटवड नगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे बराच भाग हा पाण्यात असतो. नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यावेळी महापालिकेकडून मदत केली जात असले तरी अशी घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या.
- यशवंत पाटील, खुटवड नगर, सिडको
----------
पाणी साचल्याचा फोटो..