चार तरुणांसह भोंदूबाबाला अटक

By Admin | Updated: May 3, 2016 00:36 IST2016-05-02T23:10:32+5:302016-05-03T00:36:21+5:30

लालसा : गुप्तधनासाठी जमिनीत खोदकाम

Four youths are caught in a beard | चार तरुणांसह भोंदूबाबाला अटक

चार तरुणांसह भोंदूबाबाला अटक

पेठ : गुप्तधनाच्या लालसेपोटी पेठ येथील नगरसेवकाच्या खासगी जमिनीत मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी पूजाविधी करून खोदकाम करत असताना जमीनमालकांच्या सतर्कतेमुळे चार तरुणांसह एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार नक्की गुप्तधन, नरबळी की अजून कशासाठी करण्यात आला याचा शोध पेठ पोलीस घेत आहेत़ एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर चळवळ सुरू असताना आदिवासी भागातील जनतेच्या अज्ञानाचा गैरवापर घेत अशा प्रकारच्या अघोरी विद्या केल्या जात असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठच्या नगरसेवक तुळसाबाई पोदार यांची शहरालगत इतिहासकालीन गढीजवळ
जमीन आहे़ रविवारी रात्रीच्या वेळी या ठिकाणच्या चाफ्याच्या झाडाखाली काही तरुण-तरुणी व एक बाबा यांनी पूजाविधी करून जमिनीत खोदकाम करत
असल्याची माहिती तुळसाबाई यांना लागली़ त्यांनी नातेवाइकांना मदतीला घेत घटनास्थळ
गाठले असता या ठिकाणी पूजाविधीसह जमिनीत मोठा खड्डा खोदण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले़ यावेळी घटनास्थळी दोन तरुण, दोन तरुणी व एक मांत्रिक होता़
नागरिकांनी तत्काळ पेठ पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदरची घटना कळवली़ पोलिसांनी सनी पगारे, छबू राऊत दोघे रा़पेठ, मांत्रिक दयानंद गिरीजानंद नव्हायकर, रा़ औरंगाबाद यांच्यासह दोन तरुणींनाही ताब्यात घेतले़ याबाबत अधिक तपास पेठचे पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस करत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Four youths are caught in a beard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.