इंदिरानगर : येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळा गावातून चोरीला गेलेली चारचाकी अवघ्या ४८ तासांत संशयित आरोपीला अटक करून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.वडाळागावातील जुनेद फिरोज खान (३०) याच्या मालकीची ओमनी एमएच १५ बीडी ३७४८ ही चार चाकी झिनतनगर येथील कब्रस्तानच्या मोकळ्या जागेवरून चोरीला गेली होती. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि. १०) अशोकस्तंभ येथे सापळा रचून यादीवरील गुन्हेगार संशयित आरोपी बुरहान शाकीर शेख (१९) राहणार वडाळागाव यास अटक करून चौकशी केली. यावेळी त्याने गुन्ह्णाची कबुली दिली असून, संबंधित वाहन गुन्हे शोधक पथकाने हस्तगत केली.
४८ तासांत शोधली चोरीस गेलेली चारचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:11 IST