शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

चारचाकीची चारही चाके गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:56 IST

घराच्या वाहनतळात उभी केलेली वाहनेही सुरक्षित राहिलेली नाही. चोरट्यांकडून कधी वाहने तर कधी वाहनांमधील सुटे भाग, तर कधी चक्क ज्या चाकांवर चारचाकी उभी आहे, ती सर्व चाके खोलून लंपास क रण्यापर्यंत मजल गेली आहे. यामुळे नाशिककरांना यापुढील काळात अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. सारडा सर्कल भागात अशीच घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देचोरटे ताब्यात : दुचाकीसह नऊ बॅटऱ्या हस्तगत; गुन्हे शाखेला यश

नाशिक : घराच्या वाहनतळात उभी केलेली वाहनेही सुरक्षित राहिलेली नाही. चोरट्यांकडून कधी वाहने तर कधी वाहनांमधील सुटे भाग, तर कधी चक्क ज्या चाकांवर चारचाकी उभी आहे, ती सर्व चाके खोलून लंपास क रण्यापर्यंत मजल गेली आहे. यामुळे नाशिककरांना यापुढील काळात अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. सारडा सर्कल भागात अशीच घटना उघडकीस आली आहे.सदर घटना सारडा सर्कलवरील उमा शंकर सोसायटीत घडली. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, मोहियोद्दीन फकरूद्दीन (७१) यांच्या राहत्या घरातील वाहनतळात त्यांची मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच १२, एफके १६१५) नेहमीप्रमाणे उभी होती. या मोटारीची चारही चाके मॅकव्हीलसह चोरट्यांनी लांबविली. ही घटना रविवारी (दि.५) घडली होती. ६० हजार रु पये किमतीच्या मॅकव्हीलसह मोटारीची चाके चोरी झाल्याची फिर्याद मोहियोद्दीन यांनी भद्रकाली पोलिसांकडे दाखल केली होती. या गुन्ह्याचा संयुक्त तपास भद्रकाली पोलीस व गुन्हे शाखा युनिट १च्या पथकाकडून केला जात होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला चोरट्यांना बेड्या ठोकण्यास यश आले आहे. दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोटारीची चार चाके, एक दुचाकी, मोटारींच्या ९ बॅटºया असा सुमारे १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तपासात देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील ट्रकच्या तीन बॅटºया चोरीचा, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील वरील गुन्हा व पंचशीलनगरमधून चोरलेली अ‍ॅक्सेस मोपेड दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित समीर हमीद शहा (रा. गंजमाळ), इरफान नईम शेख (ढिकले मळा, जेलरोड) यांना अटक केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी