शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जेऊर शिवारात चौघांची भीषण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:28 IST

नांदगावपासून काही अंतरावर असलेल्या वाखारी शिवारात चव्हाण कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी या चौघांची भीषण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला आहे. घटना आर्थिक व्यवहार किंवा अनैतिक संबंधातून घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे. अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील चौघे : मृतात दोन बालकांचा समावेश; मालेगाव तालुक्यातील थरार

मालेगाव : नांदगावपासून काही अंतरावर असलेल्या वाखारी शिवारात चव्हाण कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी या चौघांची भीषण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला आहे. घटना आर्थिक व्यवहार किंवा अनैतिक संबंधातून घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे. अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समाधान अण्णा चव्हाण (३५), भारती समाधान चव्हाण (२६), आराध्या समाधान चव्हाण (७) व अनिरुद्ध समाधान चव्हाण (५)(सर्व रा. जेऊर) हे ओट्यावर झोपले होते. त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मानेवर, डोक्यावर, हातावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.रक्षाबंधनाच्या दिवशी नियोजन करून हत्या केल्याचा संशय असून, घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल होत त्यांनी तपासाला प्रारंभ केला आहे. पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला कुºहाडीचा लाकडी दांडा मिळून आला आहे.समाधान चव्हाण हा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. परंतु गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे त्याचा रिक्षा व्यवसाय बंद असल्याने त्यांना आर्थिक चणचण जाणवत असल्याची चर्चा होती. संशयितांनी त्यांची हत्या का केली याचा उलगडा उशिरापर्यंत होऊ शकला नव्हता.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी