रिक्षाचालक गव्हाळ खून प्रकरणी चार संशयितांना अटक
By Admin | Updated: October 24, 2015 23:33 IST2015-10-24T23:32:22+5:302015-10-24T23:33:32+5:30
रिक्षाचालक गव्हाळ खून प्रकरणी चार संशयितांना अटक

रिक्षाचालक गव्हाळ खून प्रकरणी चार संशयितांना अटक
नाशिक : क्रांतिनगर येथील रिक्षाचालक नीलेश गव्हाळ खून प्रकरणी तालुका पोलिसांनी त्याच्या सात मित्रांना अटक केली आहे़ या संशयितांनी पोलिसांकडे खुनाची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे़
या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी लखन राजेंद्र पवार (वय ३०, रा. फुलेनगर), चेतन द्वारकानाथ दिवे (वय २५, रा. पेठरोड, पंचवटी) व बाबड्या शिवाजी बढे (वय ३९, रा. रामवाडी, तळेनगर) या संशयितांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी केली असता यांनी यामध्ये प्रकाश पांडुरंग गवळी (मालेगाव स्टॅन्ड), स्वरूप शरद देशमुख (वय ३०, शिंदेनगर पेठरोड), मनोज सयाजी सोनवणे (वय ३५, रा. स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद) व अतुल शशिकांत मुर्तडक (वय २९, रा. बिडी कामगारनगर, पंचवटी) या संशयितांचा समावेश असल्याची माहिती दिली़
तालुका पोलिसांनी या खून प्रकरणात पकडलेल्या चौघा संशयिताना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)