‘यूपीएससी’मध्ये चमकले नाशिकचे चार विद्यार्थी

By Admin | Updated: July 5, 2015 00:46 IST2015-07-05T00:46:02+5:302015-07-05T00:46:23+5:30

‘यूपीएससी’मध्ये चमकले नाशिकचे चार विद्यार्थी

Four students of Nashik shine in 'UPSC' | ‘यूपीएससी’मध्ये चमकले नाशिकचे चार विद्यार्थी

‘यूपीएससी’मध्ये चमकले नाशिकचे चार विद्यार्थी

नाशिक : यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन २०१३-२०१४ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल शनिवार (दि.४) रोजी संकेतस्थळावर जाहीर केला. यामध्ये नाशिकमधील चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयएएस, आयपीएस, आयएफएस आदि प्रशासकीय सेवांसाठी परीक्षा घेतली होती. देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. महाराष्ट्रातून यावर्षी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये मराठीचा टक्का अचानक वाढला आहे. नाशिक जिल्'ातील स्वप्नील शरद कोठावदे (रॅँक ७५५), कल्याणी राजन मालपुरे (रॅँक ७४२), धीरज राजेंद्र सोनजे (रॅँक १००१), उमेश खांडबहाले (रॅँक ७०४) यावर्षीच्या निकालाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे आयोगाने निकालाच्या एक दिवस अगोदरच संकेतस्थळावर निकाल जाहीर होण्याची तारीख प्रदर्शित केली होती. त्याचप्रमाणे २५४ उमेदवारांच्या नावांची प्रतीक्षा यादीदेखील आयोगाने निकालाबरोबरच प्रथमच प्रसिद्ध केली आहे. कल्याणी हिने मुंबई येथील महाविद्यालयातून बी-टेकची पदवी मिळविली आहे. कल्याणी हिने पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली, तर धीरज यांनी सहायक विक्रीकर आयुक्त पदाची नोकरी करत युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. धीरज यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत.

Web Title: Four students of Nashik shine in 'UPSC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.