नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील दोन मेडिकल, आईस्क्रीम व अॅटोमोबाइल अशी चार दुकाने एकाच रात्री फोडल्याची घटना घडली आहे़ गोविंदनगर, सद्गुरुनगर आणि शिंगाडा तलाव परिसरातील ही दुकाने असून, यामुळे दुकानदार भयभीत झाले आहेत़ या परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे़ मुंबई नाका पोलीस ठाण्यात ऋषिकेश यादवराव गवळी (रा. श्रीसंत अपार्ट.सद्गुरुनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि़ २) मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे श्री गणेश मेडिकल स्टोअर्स या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम व कॉस्मेटिकच्या वस्तू चोरून नेल्या़ यानंतर चोरट्यांनी सद्गुरुनगरमधील आवारे हॉस्पिटल भागातील अमोल आईस्क्रीम आणि नंदिनी मेडिकल फोडून गल्ल्यातील रोकड व महागड्या वस्तू चोरून नेल्या. शिंगाडा तलाव भागातील ओमकार गोविलकर यांच्या अॅटोमोबाइल दुकानाकडे चोरट्यांनी मोर्चा वळवित गल्ल्यातील रोकड चोरून नेली. एकाच रात्री झालेल्या या चार घरफोडींमध्ये १२ हजार ४०० रुपयांची रोकड व साहित्य चोरून नेले़ चोरीची रक्कम कमी असली तरी एकाच रात्री झालेल्या या घटनांमुळे दुकानदारांमध्ये घबराट पसरली आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
एकाच रात्रीत चार दुकाने फोडली चोरट्यांचा धुमाकूळ; दुकानदार भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:32 IST
नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील दोन मेडिकल, आईस्क्रीम व अॅटोमोबाइल अशी चार दुकाने एकाच रात्री फोडल्याची घटना घडली आहे़
एकाच रात्रीत चार दुकाने फोडली चोरट्यांचा धुमाकूळ; दुकानदार भयभीत
ठळक मुद्देयामुळे दुकानदार भयभीत झाले आहेतगल्ल्यातील रोकड चोरून नेली