लासलगाव गटात चौरंगी लढत

By Admin | Updated: February 16, 2017 23:06 IST2017-02-16T23:06:37+5:302017-02-16T23:06:51+5:30

लासलगाव गटात चौरंगी लढत

Four rounds in Lashalgaon | लासलगाव गटात चौरंगी लढत

लासलगाव गटात चौरंगी लढत

 प्रचारात रंगत : मतदारांच्या भेटींवर भरशेखर देसाई ल्ल लासलगाव
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या लासलगाव जिल्हा परिषद गटात यावेळी वेगळ्या राजकीय स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. गेली अनेक दशके स्थित्यंतर अनुभवणारा हा गट यावेळी पंचरंगी लढत असली तरी खरी लढत चौरंगी असणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जयदत्त होळकर व काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले नानासाहेब पाटील यांच्यात होळकर-पाटील लढत होईल. असा सामना न होता शिवसेनेकडून वेदिका जयदत्त होळकर, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने डी.के. जगताप यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बबन कचरू शिंदे, कॉँग्रेसचे दत्तात्रय डुकरे तर बसपाचे नजीर दगुमिया शेख हे उमेदवार मतदारांना सामोरे जात आहेत. लासलगाव गट हा यावेळी इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता राखीव आहे तर गटातील लासलगाव गण हा महिला जनरल करिता तर खडकमाळेगाव गण हा जनरल पुरुष राखीव आहे. यापूर्वी कुसुम सीताराम होळकर या सदस्य राहिल्या आहेत. आता प्रथमच
होळकर घराण्यातील सून रिंगणात उतरली आहे. लासलगाव ग्रामपंचायत सदस्य डी.के. जगताप या वेळी भाजपात दाखल झाले व त्यांनी उमेदवारी केली. पाणीटंचाई जाणवत असताना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत त्यांनी केलेल्या कामाची जनता किती दखल घेते हे मतदान यंत्रे दाखविणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बबन कचरू शिंदे तर कॉँग्रेसचे दत्तात्रय डुकरे यांनी प्रचारात रंगत आणली आहे.

Web Title: Four rounds in Lashalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.