नाशिकरोड कारागृहातील चार बंदिवानांचे उपोषण
By Admin | Updated: October 11, 2015 22:37 IST2015-10-11T22:35:20+5:302015-10-11T22:37:29+5:30
नाशिकरोड कारागृहातील चार बंदिवानांचे उपोषण

नाशिकरोड कारागृहातील चार बंदिवानांचे उपोषण
नाशिक : गुन्ह्यातील सहभागाच्या संशयावरून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कोठडीत असलेल्या बंदिवानांनी न्यायालयात पेशीसाठी नेले जात नसल्याच्या आरोप करून उपोषण सुरू केले आहे़ कारागृहात सिडकोतील टिप्पर गँगचा म्होरक्या व मोक्काचा आरोपी समीर नासीर पठाण (न्यायालयीन बंदी क्रमांक ५२), नितीन बाळकृष्ण काळे, सुनील भास्कर आनसे (न्यायालयीन बंदी क्रमांक ५८२) व सुनील दौलत खोकले (न्यायालयीन बंदी क्रमांक ५६) या चौघांनी हे उपोषण सुरू केले आहे़ समीर पठाण याने तुरुंग अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार गेल्या चार महिन्यांपासून त्यास न्यायालयात हजर करण्यात आलेले नाही.(प्रतिनिधी)