शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 18:19 IST

मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतर, भारतनगर, शिवाजी वाडी, नंदिनीनगरसह परिसरात दिवसागणिक झोपड्या वाढत असून, त्याचबरोबर अवैध धंदे वाढत आहे. यामध्ये मटका, जुगार, गांजा विक्री आणि कत्तलखाने सर्रास सुरू आहे.

ठळक मुद्देमुंबई नाका : बदल्या करूनही परिस्थिती ‘जैसे थे’मुंबई नाका पोलीस ठाणे अपयशी ठरले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या गेल्या दोन महिन्यांत बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांमागे गुन्हेगारीत वाढ व अवैध धंदे रोखण्यात आलेले अपयश असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करूनही उपरोक्त प्रकार सुरूच असून, याच कारणावरून यापूर्वी बदली केलेल्या विजय ढमाळ यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतर, भारतनगर, शिवाजी वाडी, नंदिनीनगरसह परिसरात दिवसागणिक झोपड्या वाढत असून, त्याचबरोबर अवैध धंदे वाढत आहे. यामध्ये मटका, जुगार, गांजा विक्री आणि कत्तलखाने सर्रास सुरू आहे. या अवैध धंद्यांमुळे व्यावसायिकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असून, त्यातून अनेक वेळेस हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु त्याला आळा घालण्यास मुंबई नाका पोलीस ठाणे अपयशी ठरले आहे. या भागातील अवैध धंद्यांवर आत्तापर्यंत गुन्हे शाखेच्या युनिट १ व २ च्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनेक वेळेस छापे टाकून कारवाई केली आहे. गुन्हे शाखेला अवैध धंद्यांची खबर लागते, परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई नाका पोलिसांना त्याची खबर नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याच कारणावरून गेल्या दोन महिन्यांत पोलीस ठाण्याच्या चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात अनुक्रमे विजय ढमाळ, नारायण न्याहळदे, साजन सोनवणे यांचा समावेश असून, आता पुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी विजय ढमाळ यांचीच नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या अधिका-यांच्या बदल्या करूनही परिस्थिती जैसे थे राहात असून, हा प्रयोग किती वेळा करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. विजय ढमाळ यांनी यापूर्वीही मुंबई नाका पोलीस ठाण्यात काम केले असल्याने त्यांना हद्दीतील खडान खडा माहिती असून, आता नव्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण व अवैध धंद्यांचा बिमोड करून ते पुन्हा बदलीला पात्र ठरणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय