गुदाम फोडणाऱ्या चौघांना अटक

By Admin | Updated: June 2, 2016 23:03 IST2016-06-02T22:37:57+5:302016-06-02T23:03:07+5:30

गुदाम फोडणाऱ्या चौघांना अटक

The four persons who got the warehouse were arrested | गुदाम फोडणाऱ्या चौघांना अटक

गुदाम फोडणाऱ्या चौघांना अटक

 नाशिकरोड : सुभाषरोड जियाउद्दीन डेपो येथे बारदानचे गुदाम फोडून सव्वालाख रुपये किमतीचे बारदान व सुतळी चोरून नेणाऱ्या चौघा चोरट्यांना पोलिसांनी अटक करून माल जप्त केला आहे.
सुभाषरोड जियाउद्दीन डेपोमध्ये जेठामल ठक्कर यांचे बारदानचे गुदाम आहे. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गुदाम फोडून एकूण १ लाख १४ हजार ७५० रुपयांचा माल चोरून नेला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. आर. ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उत्तम दळवी, कय्युम सय्यद, मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मनोज पाटील आदिंनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टेम्पोचालक राजू सुखानंद घुले (रा. सुभाषरोड) यास ताब्यात घेऊन खाक्या दाखविताच त्याने इतर तीन सहकाऱ्यांसह चोरी केल्याची कबुली दिली. टेम्पो
(एमएच १५ ईजी ५३९४) हिच्यामधून बारदान व सुतळी पुणे जिल्ह्यातील नारायणगावाजवळील बोटा या गावी विकल्याचे सांगितले. घुले याचे साथीदार वसीम अब्दुल शेख, अजीम सलीम शेख, सागर शशिकांत वाघ (सर्व रा. पवारवाडी सुभाषरोड) यांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत चोरीस विकलेले चोरीचे बारदान व सुतळीच्या गाठी जप्त केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: The four persons who got the warehouse were arrested