शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या खूनप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 23:52 IST

मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकावर प्रेयसीच्या डोळ्यांसमोर प्रियकराला चाकूने सपासप वार करून चार आरोपी नंदीग्राम एक्स्प्रेसने कल्याणकडे फरार झाले होते. या प्रकरणी मयत युवकाच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशिवमला चाकूने भोसकून सपासप वार करून ते चारही जण धावती गाडी पकडून पसार

मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकावर प्रेयसीच्या डोळ्यांसमोर प्रियकराला चाकूने सपासप वार करून चार आरोपी नंदीग्राम एक्स्प्रेसने कल्याणकडे फरार झाले होते. या प्रकरणी मयत युवकाच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऐन दिवाळीत मनमाड रेल्वेस्थानकावर चांदवड तालुक्यातील उसवड या गावी राहणारा शिवम संजय पवार या युवकाची शुक्रवारी (दि.६) हत्या करण्यात आली होती. ही हत्या इन्स्टाग्रामवर फेक आयडी करून अश्लील फोटो टाकल्याचा राग आणि प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथे राहणाऱ्या मनीषा नावाच्या तरुणीसोबत मोबाइलच्या इन्स्टाग्रामवरून शिवमची ओळख झाली होती. या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही एकमेकांच्या संपर्कात असताना आपली प्रेयसी तिच्या तीन मित्रांसोबत फिरते, फोनवर बोलते आणि मेसेजवर चाट करत असल्याचा राग शिवमच्या मनात होता. या संशयावरून शिवमचे या तिघांमधील एकासोबत आणि आपल्या प्रेयसीशी फोनवर जोरदार भांडण झाले. तू आमच्यासोबत कामावर राहते, त्यामुळे शिवमने त्याचा राग धरून आमच्या इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार केला. आम्हाला बदनाम करतो आहे. त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी त्याला इकडे बोलावून घेण्याचे मनीषाला सांगितले. मात्र, शिवमला कल्याणला बोलावले असता त्यानेच या सर्वांना मनमाडला बोलावून घेतले. त्यानुसार, शिवमची प्रेयसी मनीषा तिचे मित्र चेतन, मोहित, नील आणि मयूर असे पाच जण कल्याण स्टेशनवरून मनमाडला आले. रेल्वेस्थानकावर शिवमचे या चार जणांसोबत भांडण झाले. त्याचा राग येऊन शिवमला चाकूने भोसकून सपासप वार करून ते चारही जण धावती गाडी पकडून पसार झाले होते.या प्रकरणी मयत युवकाच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस