ट्रकमध्ये रॉकेल भरताना चौघांना अटक
By Admin | Updated: May 15, 2017 00:50 IST2017-05-15T00:50:09+5:302017-05-15T00:50:40+5:30
मालेगाव : रेशनवर उपलब्ध करून दिलेले निळे घासलेट कोठूनतरी काळ्याबाजाराने प्राप्त करुन ते ट्रकमधील पेट्रोल टॅँकमध्ये भरताना चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले

ट्रकमध्ये रॉकेल भरताना चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शासनाने गरिबांना घरगुती वापरासाठी रेशनवर उपलब्ध करून दिलेले निळे घासलेट कोठूनतरी काळ्याबाजाराने प्राप्त करुन ते ट्रकमधील पेट्रोल टॅँकमध्ये भरताना चौघांना पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ट्रकसह निळे घासलेट व साहित्य असा सहा लाख ५६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल मड्डेजवळ गॅरेज आवारात ही कारवाई करण्यात आली. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक नितीन खैरनार व त्यांच्या पथकाने कारवाई केली.
उपनिरीक्षक खैरनार यांनी पवारवाडी पोलिसात फिर्याद दिली. साजिद जनता (पूर्ण नाव माहीत नाही), वसीम अहमद मोहंमद सादिक रा. नयापुरा, शहेजादअली अलीम अली, रा. नया आझादनगर आणि ट्रक (क्र. एमएच ४१ जी ७२२६) चा मालक आणि पळून गेलेला एक अशा पाच जणांनी संगनमत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.