फसवणूक प्रकरणी चार जणांना अटक
By Admin | Updated: September 23, 2015 23:00 IST2015-09-23T23:00:30+5:302015-09-23T23:00:58+5:30
फसवणूक प्रकरणी चार जणांना अटक

फसवणूक प्रकरणी चार जणांना अटक
मनमाड : गृहोपयोगी वस्तू हप्त्यावर देण्याचे आमिष दाखवून प्रत्यक्षात वस्तू देण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोपावरून मनमाड शहर पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेप्रमाणेच अन्य काही गावांत योजना सुरू करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, योजना गुंडाळ्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सोमनाथ गिते, रा. पानेवाडी, मच्छिंद्र काळे, रा. जोंधळवाडी, संदीप तनपुरे, अमोल तनपुरे (दोघे, रा. आडगाव रेपाळ ता. येवला) या चौघांनी गृहोपयोगी वस्तूंचा लकी ड्रॉ काढला होता. दर आठवड्याला ३७५० रुपये घेऊन विशिष्ट मुदतीनंतर वस्तू दिली जात होती. ग्राहकांना या योजनेसाठी नोंदणी क्रमांक एम एच ९१६ / २०१२-१३ ची कार्ड देण्यात आली होती. सहा हजार सभासदांकडून ३७५० रुपयांचे दहा हप्ते घेऊन सभासदाला १००० ते १२०० रुपयांची वस्तू देण्याचे कबूल करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. विलास इपर यांनी फिर्याद दिली.
दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.अधिक तपास पो. नि. भागवत सोनवणे करत आहे.(वार्ताहर)