वडांगळी केंद्रावर चार कॉपीबहाद्दर पकडले
By Admin | Updated: February 18, 2016 23:12 IST2016-02-18T23:10:35+5:302016-02-18T23:12:29+5:30
वडांगळी केंद्रावर चार कॉपीबहाद्दर पकडले

वडांगळी केंद्रावर चार कॉपीबहाद्दर पकडले
सिन्नर : तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रांवर गुरुवारपासून बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तालुक्यातील वडांगळी येथील परीक्षा केंद्रावर चार कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पकडण्यात आले.
तालुक्यातून चार हजार ३०९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने त्यासाठी २५३ पुनर्परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. जिल्हास्तरीय भरारी पथकाने पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाला तालुक्यात येऊन चार कॉपीबहाद्दरांना पकडले. दरम्यान, तालुक्यातील प्रत्येक केंद्रावर कॉपीविरोधी बैठे पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मळ यांनी दिली. (वार्ताहर)