नाशिक : पीककर्ज तसेच शेतीच्या नुकसानीच्या कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील १६ शेतकºयांच्या आत्महत्या प्रकरणांविषयी चर्चा करण्यात येऊन आत्महत्याग्रस्त शेतकºयांची चार कुटुंबे मदतीस पात्र ठरली आहेत. तीन प्रकरणांची फेर चौकशी होऊन मदतीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्णातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समोर आलेली प्रकरणे तालुका पातळीहून तहसीलदारांमार्फत प्राप्त झालेले प्राथमिक अहवाल यावर विचार करण्यात आला. चर्चेअंती टास्क फोर्स समितीच्या बैठकीत १६ शेतकरी आत्महत्या प्रकरणांपैकी चार प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरल्याने मृत शेतकºयांच्या वारसांना एक लाखाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. दरम्यान, तीन प्रस्ताव फेरचौकशीसाठी तर ९ प्रस्ताव उपस्थित सदस्याच्या सहमतीने अमान्य करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी शेतकरी आत्महत्या संदर्भातील संपूर्ण अर्ज छाननी करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांनी कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ मदत कशी देता येईल, यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने उपस्थित होते.यांचे प्रस्ताव मंजूरप्रस्ताव मंजूर झालेल्या शेतकºयांमध्ये पिंपळगाव (ता. निफाड) येथील सुरेश निवृत्ती विधाते, रामनगर (ता.निफाड) येथील हेमंत भीमराव माळोदे, अजमेर, तर बागलाण तालुक्यातील नवल जयराम पवार व तेनसिंग मानसिंग मगर या शेतकºयांचा समावेश आहे.
१६ पैकी चार कुटुंबे मदतीस पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:14 IST
पीककर्ज तसेच शेतीच्या नुकसानीच्या कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील १६ शेतकºयांच्या आत्महत्या प्रकरणांविषयी चर्चा करण्यात येऊन आत्महत्याग्रस्त शेतकºयांची चार कुटुंबे मदतीस पात्र ठरली आहेत. तीन प्रकरणांची फेर चौकशी होऊन मदतीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
१६ पैकी चार कुटुंबे मदतीस पात्र
ठळक मुद्देआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणांवर टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय