टेहरेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST2021-05-01T04:14:32+5:302021-05-01T04:14:32+5:30
सोयगाव : मालेगाव तालुक्यातील टेहरे गावातील शिवनेरी नगर परिसरातील एकाच शेवाळे परिवारातील चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा ...

टेहरेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
सोयगाव : मालेगाव तालुक्यातील टेहरे गावातील शिवनेरी नगर परिसरातील एकाच शेवाळे परिवारातील चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
प्रथम पुतण्या मधुकर दामू शेवाळे, त्यांचे काका नारायण विश्राम शेवाळे, विक्रम दादाजी शेवाळे आणि तुळसाबाई शेवाळे अशा चारजणांचे एका पाठोपाठ निधन झाले. टेहरे गावातील प्रगतशील शेतकरी मधुकर दामू शेवाळे (६१) यांचे पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांचे काका प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण विश्राम शेवाळे (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुधाकर शेवाळे यांचे ते वडील होत. त्यांच्या कुटुंबातील तुळसाबाई पर्वत शेवाळे (८०) यांचे निधन झाले तर विक्रम दादाजी शेवाळे (७५) यांचेही निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, सून असा परिवार आहे.