अमृतधामला चार लाखांची घरफोडी

By Admin | Updated: September 7, 2015 00:30 IST2015-09-07T00:29:49+5:302015-09-07T00:30:40+5:30

अमृतधामला चार लाखांची घरफोडी

Four lakhs of ammunition to Amritdhama | अमृतधामला चार लाखांची घरफोडी

अमृतधामला चार लाखांची घरफोडी

पंचवटी : आडगाव शिवारातील अमृतधाम परिसरात असलेल्या फ्लोरा हाईट्स इमारतीतील बंद घराचा कडी- कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून सुमारे १७ तोळे वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ४० हजारांची रोकड असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत श्रीकांत संभाजी सूर्यवंशी यांंनी दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यवंशी यांचा अमृतधाम येथील फ्लोरा हाईट्समध्ये फ्लॅट असून, त्याठिकाणी दोघे पती-पत्नी राहतात. शनिवारी पती-पत्नी कामानिमित्ताने सकाळी घराबाहेर पडले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले १७ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, तसेच ४० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सायंकाळी सूर्यवंशी हे घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील कपाट उघडे दिसले व कपाटातील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे निदर्शनास आल्याने चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत घरफोडी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Four lakhs of ammunition to Amritdhama