जिल्ह्यात चार लाख रोपांची लागवड
By Admin | Updated: July 2, 2017 00:15 IST2017-07-02T00:11:44+5:302017-07-02T00:15:05+5:30
वनविभाग : संततधारेत वनमहोत्सवाला दमदार सुरुवात

जिल्ह्यात चार लाख रोपांची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वन मंत्रालयाक डून राज्यस्तरावर चार कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट चालू आठवड्यात वनमहोत्सवाद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्णात वनविभागाच्या वतीने सुमारे चार लाख ६९ हजार ८७६ रोपांची यशस्वीरीत्या लागवड शनिवारी (दि.१) करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
राज्यस्तरावर वनमहोत्सव लोकसहभागातून राबविला जात आहे. वनविभागासह सर्वच शासकीय, निमशासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. शनिवारी या वनमहोत्सवाचा थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. इगतपुरीजवळील बोरटेंभे या ठिकाणी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह वनविभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. वनविभागाच्या पश्चिम भागाला सहा लाख अठरा हजार ९७५ रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २९ ठिकाणी पश्चिम विभागाकडून एक लाख २३ हजार ५४० रोपांची लागवड करण्यात आली.
वनविभाग पूर्वच्या वतीने सहा लाख बारा हजार १५१ रोपांच्या उद्दिष्टांपैकी पहिल्या दिवशी ९४ हजार १०८ रोपे २९ ठिकाणांवर लावण्यात आली. मालेगाव वनविभागाच्या हद्दीत ४३ ठिकाणांवर नऊ लाख ५३ हजार रोपांच्या उद्दिष्टांपैकी शनिवारी एक लाख ४० हजार ७५१ रोपे लावली गेली. सामाजिक वनीकरण विभागाकडून एक लाख एक हजार रोपांच्या उद्दिष्टांपैकी २२ हजार ९५० रोपे लावली गेली, तर वनविकास महामंडळाने तीन लाख ५० हजार रोपे लागवडीच्या उद्दिष्टांपैकी ८८ हजार ३२७ रोपे ३८ ठिकाणांवर लावली. वन्यजीव विभागाने एका ठिकाणी २०० रोपांची लागवड केली.
वनमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरासह जिल्ह्यात वनविभागाकडून सुमारे चार लाख ६९ हजार ८७६ रोपांची लागवड करण्यात आल्याचा दावा वन खात्याने केला आहे.भर पावसात एकत्र आले हजारो हातहरित भविष्यासाठी एक वृक्ष लावू व त्याचे संगोपन करू हे व्रत घेऊन वनमहोत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी एकत्र येत हजारो रोपांची लागवड केली. भर पावसात वृक्षारोपणासाठी शेकडो हात एकत्र आले होते. रेनकोट, छत्र्यांचा आधार घेत लागवड करण्यात आली. लावलेल्या लाखो रोपांचे संवर्धन झाल्यास जंगलाचे क्षेत्र वाढीस हातभार लागणार आहे.