सोनांबे येथील द्राक्षबागायतदाराला चार लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:37 IST2020-12-04T04:37:11+5:302020-12-04T04:37:11+5:30

सोनांबे येथील योगेश चंद्रभान पवार यांच्या फिर्यादीवरून व्यापारी अजयसिंग शिवभजन याच्याविरोधात सिन्नर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. योगेश ...

Four lakh to a grape grower in Sonambe | सोनांबे येथील द्राक्षबागायतदाराला चार लाखांचा गंडा

सोनांबे येथील द्राक्षबागायतदाराला चार लाखांचा गंडा

सोनांबे येथील योगेश चंद्रभान पवार यांच्या फिर्यादीवरून व्यापारी अजयसिंग शिवभजन याच्याविरोधात सिन्नर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश पवार यांनी सोनांबे येथील गट नं. ६२२ व ६२३ मध्ये द्राक्षबागेची लागवड केली असून, गेल्या ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत व्यापारी अजयसिंग शिवभजन याने पवार यांच्या शेतात येऊन ३२०० रुपये प्रतिक्विंटल दराने १४२ क्विंटल द्राक्ष ४ लाख ५४ हजार ४०० रुपयांना खरेदी केले. या रकमेपैकी ५० हजार रुपये अजयसिंग शिवभजन याने पवार यांना रोख देत उर्वरित ४ लाख ४ हजार रुपये नंतर पाठवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. नंतर पवार यांनी अजयसिंग शिवभजन याने दिलेल्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही रक्कम न मिळाल्याने पवार यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अजयसिंग शिवभजन याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करीत आहेत.

Web Title: Four lakh to a grape grower in Sonambe