शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावजवळ भाविकांच्या टेम्पोला अपघात, चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 01:56 IST

मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४जण ठार झाले असून,८जण जखमी झाले आहेत. जखमींवर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देटेम्पोला पिकअपची धडक अपघातग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडाचे रहिवासी

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४जण ठार झाले असून,८जण जखमी झाले आहेत. जखमींवर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला.

चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविक मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. खंडेराव महाराजांचे दर्शन व गोंधळाचा कार्यक्रम आटोपून भाविक पुन्हा आपल्या गावाकडे निघाले होते. गिगाव फाट्यावर आल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या पिकअप आणि टेम्पोत जोरदार धडक झाली. यात टेम्पो उलटला. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना टेम्पोतून बाहेर काढून तालुका पोलिसांना याची खबर दिली. तत्काळ घटनास्थळी पोलिसांसह रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात लीलाबाई पोपट पाटील (वय ७५), कांतीलाल पोपट पाटील (५०), बन्सीलाल राघो पाटील (५०) सर्व रा. मुंदखेडा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव तसेच आबाजी जालम पाटील (७५) रा. मेठु, ता. पारोळा, जि. जळगाव हे ठार झाले, तर जखमींमध्ये सुनीता शिवलाल पाटील, रत्नाबाई कांतीलाल पाटील, बळीराम रामचंद्र पाटील, वैष्णा सुहालाल पाटील, पोपट महादू पाटील, गोविंदा रतन पाटील, अनुसया रतन पाटील, विजय रामराव पाटील यांचा समावेश आहे. घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शैलेश बच्छाव, जमादार राजपूत यांनी भेट दिली. जखमींना तातडीने उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघातDeathमृत्यू