सटाणा/औंदाणे : भरधाव जाणाऱ्या पिकअपखाली दुचाकी सापडून झालेल्या भीषण अपघातात अंतापूर येथे कंदुरीला गेलेले चार तरुण जागीच ठार झाले.सदर अपघात गुरुवारी (दि. १०) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील औंदाणेनजीक घडला. मृतांपैकी तिघे शाळकरी मुले असल्याने दुंधे तळवाडे गावावर शोककळा पसरली आहे.मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील जिभाऊ पवार यांच्याकडे अंतापूर येथे दावल मलिक बाबा मंदिरात कंदुरीचा कार्यक्रम होता. जेवण आटोपून चारही युवक एकाच मोटारसायकलीने तळवाडे गावाकडे परतत होते. हे युवक सटाणा-मालेगावमार्गे परतण्यास निघाले. औंदाणे गावाजवळील गौरव निकम यांच्या शेताजवळ पिकअपने (एमएच १८ डीबी २९०३) मोटार-सायकलला धडक दिली.अपघातात मोटारसायकलवरील समाधान दादाजी पटाईत (१८ रा. दुंधे तळवाडे, ता.मालेगाव), अरुण देवरे (१९), ऋतिक ऊर्फ अनिल दगडू माळी (१८), शरद तानाजी सोनवणे (२२ रा. तळवाडे) हे जागीच ठार झाले. चालक पसार झाला आहे.
अपघातात चार ठार; मृतांत तीन विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:06 IST
भरधाव जाणाऱ्या पिकअपखाली दुचाकी सापडून झालेल्या भीषण अपघातात अंतापूर येथे कंदुरीला गेलेले चार तरुण जागीच ठार झाले.
अपघातात चार ठार; मृतांत तीन विद्यार्थी
ठळक मुद्देऔंदाणेनजीकची घटना : दुंधे तळवाडे गावावर शोककळा