टँकर-इंडिका कार अपघातात चौघे जखमी

By Admin | Updated: July 21, 2016 23:21 IST2016-07-21T23:18:12+5:302016-07-21T23:21:48+5:30

बोरगाव - सापुतारा मार्गावर दुर्घटना

Four injured in tanker-Indica car crash | टँकर-इंडिका कार अपघातात चौघे जखमी

टँकर-इंडिका कार अपघातात चौघे जखमी

सुरगाणा : तालुक्यातील बोरगाव - सापुतारा राज्यमार्गावर दुधाचा टँकर व इंडिका कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील चौघे जण जखमी झाले.
ठाणापाड्याजवळ बोरगावकडे जाणारी टाटा इंडिका कार (क्र . जीजे १५ सीए ३९६७) आणि सापुताऱ्याकडे जाणारा दूध टँकर (क्र . जीजे १२ बीटी ५१५५) यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. यावेळी कारमधील फेमीनभाई पटेल (२२), हितेश प्रवीण पटेल (३२), निळूज खंडू पटेल (३५) व आर्य भरत पटेल, सर्व रा.बारडोली (गुजरात) चौघे जखमी झाले. याप्रसंगी बोरगाव येथील राष्ट्रवादी श्रमिक संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ गांगुर्डे व रवि जाधव यांनी आपल्या वाहनातून सर्व जखमींना वेळीच सापुतारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी फेमीनभाई पटेल यांच्या डोक्यातून व कानातून रक्तस्राव होत असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने सुरत येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघात घडताच टँकरचालक फरार झाला. सुरगाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Four injured in tanker-Indica car crash