दिवाळी स्वच्छतेमुळे वाढला चारशे टन कचरा
By Admin | Updated: October 31, 2015 22:17 IST2015-10-31T22:15:01+5:302015-10-31T22:17:47+5:30
दिवाळी स्वच्छतेमुळे वाढला चारशे टन कचरा

दिवाळी स्वच्छतेमुळे वाढला चारशे टन कचरा
इंदिरानगर : दिवाळीमुळे सध्या घराघरात आणि दुकानांमध्ये सुरू असलेल्या साफसफाईमुळे दररोज सुमारे तीस ते चाळीस टन कचऱ्यात वाढ झाली असून, इतका कचरा खतप्रकल्पात जमा होत आहे. त्यामुळे आधीच कचऱ्याचे डोंगर झालेल्या खतप्रकल्पात मात्र अडचण होणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांमध्ये साफसफाई आणि रंगरंगोटीची कामे चालतात. अनावश्यक भंगार, प्लास्टिक, खोके आणि अन्य सर्व कचरा घंटागाड्यांमध्येच टाकला जातो. त्यामुळे कचऱ्यात वाढ होते. घंटागाड्या दिवसाआड येत असल्या तरी कचऱ्याचे प्रमाण मात्र वाढत जाते. सध्या अशाच प्रकारे दिवसाकाठी तीस ते चाळीस टन कचऱ्यात वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)