शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:26 IST

पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

येवला : पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.  २५ जानेवारीपर्यंत तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. सध्या ५० दलघफू साठवण क्षमतेच्या साठवण तलावात केवळ ७.५ दलघफू पाणी शिल्लक आहे. त्यात १ ते १.५ दलघफू मृत पाण्याचा साठा गृहीत धरला जातो. पालखेड पाण्याचे आवर्तन २० मार्चदरम्यान मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साठवण तलावात शिल्लक सुमारे साडेसहा दलघफू पाणी २० मार्चपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीसंकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले आहे. याबाबत शहरवासियांना ध्वनी क्षेपकावरून माहिती देण्यात आली आहे.शहर व तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक योजना असूनही शहर वासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शहर पाणीपुरवठा साठवण तलावातील पाणी संपुष्टात येण्यास नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न शहरवासीयांनी अनेकदा उपस्थित केला आहे. कोट्यावधी रु पयांच्या चार पाणीपुरवठा योजनाराबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.साठवण तलावातील शिल्लक पाण्याची पाहणी येथील प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार रोहीदास वारु ळे, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्यासह पाणीपुरवठा प्रमुख एस. एस. फागनेकर यांनी केली. यावेळी अमर्याद उपसा सुरु असलेल्या विहिरीवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना दिले.पालखेड पाणी आवर्तनानेशहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफू पाणी मार्चअखेरपर्यंत पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायालाच हवे. पण नेमके गणित बिघडले ते कुठे हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी चार दिवस आड पाणी मिळण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र श्रोत नसल्याने पालिकेच्या साठवण तलावाच्या उद्भावातून चालणाऱ्या विहिरीतील पाण्याचा वापर संपूर्ण तालुक्यातील टंचाईच्या गावांना केला जातो. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा त्यामुळे शहरात अवेळीच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ वारंवार येते. हे नित्याचे पंचायत समितीने तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी . सारा भार येवला शहरवासियांच्या माथी पडतो. शहरवासीयांनी पाणीपट्टी १२ महीन्याची भरायची आणि वर्षातून सरासरी ४ ते ६ दिवसाआड पाणी घ्यायचे हा कुठला न्याय?शहर साठवण तलाव काही विहीर मालकांसाठी आहे का ? साठवण तलाव तालुक्यासाठी आहे का ? असा प्रश्न खुलेआम नागरीकानी उपस्थित केला आहे. या बाबत देखील पालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज जाणकार व्यक्त करीत आहे.मोफत अथवा शासकीय पाणी पुरवठा या नावाखाली पाण्याचा धंदा होता कामा नये. अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर पाणी उपसा यामुळे अवेळीच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये अशी शहरवासियांची अपेक्षा आहे...अन्यथा सात दिवसाआड पाणीशहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. आता सुमारे ६ द.ल.घ.फुट पाणी शिल्लक आहे. जर काटेकोर नियोजन करून उपाय योजना केली तरच शहरवासियांना चार दिवसा आड पाणी पुरवठा करता येईल. अन्यथा ७ दिवसाआड करण्याची वेळ येईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashikनाशिक