राष्ट्रीय जलतरणमध्ये अपंग श्रेयसला चार सुवर्णपदक
By Admin | Updated: November 18, 2014 00:44 IST2014-11-18T00:42:43+5:302014-11-18T00:44:15+5:30
राष्ट्रीय जलतरणमध्ये अपंग श्रेयसला चार सुवर्णपदक

राष्ट्रीय जलतरणमध्ये अपंग श्रेयसला चार सुवर्णपदक
नाशिक - इंदोर येथे झालेल्या चौदाव्या राष्ट्रीय पॅरॉलिंपिक जलतरण स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करताना नाशिकच्या श्रेयश द्विवेदीने महाराष्ट्राला चार सुवर्णपदके मिळवूण दिली़ या स्पर्धेत २२ राज्यातील ८५० स्पर्धक ांनी सहभागी झाले होते़ यामध्ये श्रेयसने शंभर मूटर फ्री स्टाइल, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय व ब्रेसस्ट्रोक अशा चारही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी नोंदवत चार सुवर्णपदके पटकावली़ त्याला प्रशिक्षक बाळू नवने, एऩ सी़ वांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले़ या सुवर्णपदकांबाबत श्रेयसने आनंद व्यक्त केला असून, आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली़