शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जिल्हा बॅँकेचे चौघे संचालक विधिमंडळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:42 IST

नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात राजकीय नशीब अजमाविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सात संचालकांपैकी चौघांचा विधिमंडळात प्रवेश झाला असून, तिघांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे.

नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात राजकीय नशीब अजमाविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सात संचालकांपैकी चौघांचा विधिमंडळात प्रवेश झाला असून, तिघांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे. नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांना विधिमंडळात निवडून पाठविण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.सहकार व शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या नाशिक जिल्हा बॅँकेचे जिल्ह्यात हजारो सभासद असून, त्यामुळे संचालकांचे मतदार असलेल्या शेतकरी सभासदांशी जवळचा संबंध येत असतो. विविध कारणांसाठी तालुक्यातील शेतकºयांना बॅँकेच्या माध्यमातून मदत केली जात असल्यामुळे प्रामुख्याने विधानसभेच्या निवडणुकीत संचालकांना त्याचा राजकीय फायदा होत असतो. राज्याच्या विधिमंडळात आजवर जिल्हा बॅँकेच्या अनेक संचालकांनी प्रवेश केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित, चांदवडमधून शिरीष कोतवाल, निफाडमधून दिलीप बनकर, अनिल कदम, नांदगावमधून सुहास कांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे व सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे या सात संचालकांनी रिंगणात उडी घेतली. त्यातील कदम व बनकर हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. प्रत्यक्ष मतमोजणीत सात संचालकांपैकी बॅँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे, सीमा हिरे, दिलीप बनकर व माणिकराव कोकाटे हे चौघे विधिमंडळात पोहोचले. यातील सुहास कांदे वगळता अन्य तिघे संचालकांनी यापूर्वीही विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. तर जे. पी. गावित, शिरीष कोतवाल, अनिल कदम या तिघा संचालकांना पराभव चाखावा लागला आहे. जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहता, आमदार संचालकांच्या मदतीने सरकार दरबारी बॅँकेला आर्थिक मदत करण्याकामी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक