चार दिवस बॅँकांना सुटी, शुक्रवारी मात्र कामकाज
By Admin | Updated: November 11, 2015 23:35 IST2015-11-11T23:34:15+5:302015-11-11T23:35:17+5:30
कोट्यवधींची उलाढाल रोडावणार

चार दिवस बॅँकांना सुटी, शुक्रवारी मात्र कामकाज
नाशिक : लक्ष्मीपूजनासह बलिप्रतिपदा आणि दुसरा शनिवार व जोडीला रविवार आल्याने या आठवड्यात बॅँकांना सलग दोन-दोन दिवस सुटी आल्याने कोट्यवधींची उलाढाल रोडावणार असल्याचे चित्र आहे. येत्या शुक्रवारी (दि. १३) बॅँकांचे कामकाज सुरू राहणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे.
बुधवारी (दि. ११) लक्ष्मीपूजनाची व आज(दि. १२) बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याची अशा सलग दोन दिवस बॅँकांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी बॅँका सुरू राहणार असल्या तरी महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बॅँकांना सुट्या देण्यात येत असल्याने या शनिवारी (दि. १४) दुसरा शनिवार येत असल्याने बॅँका बंद राहणार असून, जोडीला रविवार (दि. १५) येत असल्याने शुक्रवारनंतर पुन्हा सलग दोन दिवस बॅँका बंद राहणार आहेत.
आठवड्यात केवळ तीनच दिवस बॅँकांचे कामकाज सुरू राहणार असल्याने आठवड्याभरात होणारी कोट्यवधी रुपयांची बॅँकांमधील उलाढाल ठप्प होणार आहे.
बॅँका बंद राहणार असल्याने बॅँकांच्या एटीएम सेवांवर ताण पडण्याची शक्यता आहे. काल बुधवारी लक्ष्मीपूजनासाठी नवीन कोऱ्या नोटा आवश्यक असल्याने शहरातील एटीएम समोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)