शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

नाशिक महापालिकेतील चौघा अधिका-यांवर दोषारोप सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 7:02 PM

चौकशी पूर्ण : मुंढेंनी दिली चौकशीला चालना, संबंधितांना बजावल्या नोटीसा

ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोरगेल्या दीड-दोन वर्षांपासून सुमारे ११ अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूद्ध झालेल्या आरोपप्रकरणी चौकशी प्रलंबित होती

नाशिक - महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फे-यात अडकलेल्या चौघा अधिका-यांवरील दोषारोप सिद्ध झाले असून चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटीसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे समजते. त्यामुळे, चौघा अधिका-यांवर गंडांतर येऊ घातले आहे.महापालिकेत गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुमारे ११ अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूद्ध झालेल्या आरोपप्रकरणी चौकशी प्रलंबित होती. या अकरा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एकच निवृत्त अधिकारी नियुक्त केलेला होता. तुकाराम मुंढे यांनी दि. ८ फेबु्रवारीला आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासनात साफसफाई मोहीम सुरू केली. काही अधिका-यांचे खातेपालट केले. त्यात, मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार सोपवितानाच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चौकशांचा महिनाभराच्या आत निपटरा करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार, गेल्या १५ दिवसांपासून चौकशांच्या फाईलींवर अभ्यास सुरू होता. त्यात, निलंबित उद्यान अधिक्षक गो. बा. पाटील, निवृत्त अधिक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन आणि मायको दवाखान्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. उद्यान अधिक्षक गो. बा. पाटील यांच्या कारकीर्दीत कोटेशन घोटाळा गाजला होता. विनानिविदा दरपत्रक मागवून वृक्षारोपणासह कारंजे दुरूस्तीचे कामे करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्याविरूद्ध आहे. याशिवाय, चौकशी अधिकारी चौकशीसाठी गेले असता त्यांना सुमारे ४५० हून अधिक संचिका गायब झाल्याचे निदर्शनास आले होते शिवाय पाटील यांनी चौकशीतही सहकार्य केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. गेडाम यांच्या कारकीर्दीत पाटील यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. निवृत्त अधिक्षक अभियंता आर. के.पवार यांच्यावर खतप्रकल्पात अनावश्यक ६७ कोटी रुपयांच्या यंत्रखरेदीचा आरोप ठेवण्यात आला होता तर अग्निशमन दल प्रमुख अनिल महाजन यांच्याविरूद्ध ना हरकत दाखल्याविषयी शासनाचे परिपत्रक दडवून ठेवत वसुली केल्याचा आरोप आहे. निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी हे मायको दवाखान्यात कार्यरत असताना एका महिलेची रिक्षातच प्रसुती झालेली होती. त्यावेळी डॉ. कोकणी हे विनापरवानगी चार दिवस गैरहजर असल्याचे आढळून आले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका