मखमलाबादला चार दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:17 AM2018-07-16T00:17:08+5:302018-07-16T00:17:36+5:30

पंचवटी : मखमलाबाद गावाजवळील रॉयल टाऊन बीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना रविवारी (दि़१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या दुचाकी नेमक्या कोणी व का जाळल्या याचे कारण समोर आलेले नसून परिसरात दहशत पसरविणे वा अंतर्गत वादातून हा प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ या घटनेमुळे सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 Four bikes were burnt to Makhmalabad | मखमलाबादला चार दुचाकी जाळल्या

मखमलाबादला चार दुचाकी जाळल्या

Next
ठळक मुद्देरविवारी घटना : नागरिकांमध्ये संताप

पंचवटी : मखमलाबाद गावाजवळील रॉयल टाऊन बीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना रविवारी (दि़१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या दुचाकी नेमक्या कोणी व का जाळल्या याचे कारण समोर आलेले नसून परिसरात दहशत पसरविणे वा अंतर्गत वादातून हा प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ या घटनेमुळे सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील रहिवासी विजय भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोसायटीतील सभासदांनी इमारतीच्या पार्किंगमध्ये रविवारी (दि़१५) नेहेमीप्रमाणे आपल्या दुचाकी उभ्या केलेल्या होत्या़ मध्यरात्री सुमारे दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास परिसरातील काही अज्ञात समाजकंटकांनी दहशत पसरविण्याच्या हेतूने पार्किंगमध्ये लावलेली भामरे यांच्या मालकीची प्लेटिना ( एमएच १५, एफके ९४१५), शारदा बुरकुले यांची हिरोहोंडा पॅशन (एमएच १५, डीडी ०११०), संतोष मोरे यांची प्लेजर (एमएच १५, डीक्यू ९४२२) तसेच सुरेश मोरे यांची एम ८० (एमएच १५, एक्स ३५१०) या चार दुचाकींना आग लावली़ इमारतीत काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने नागरिक जागे झाले व त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली़
पंचवटी अग्निशमन दलाचे जवान हे बंबासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेत तीन दुचाकी या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, दुचाकीमालकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़ काही महिन्यांपूर्वीच म्हसरूळ परिसरात वाहनांच्या काचा फोडणे तसेच जाळपोळ केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला मखमलाबाद शिवारात पुन्हा अशाप्रकारे चार दुचाकींची जाळपोळ केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़
कारवाईची मागणी
पंधरा दिवसांपूर्वीच पंचवटीतील सीतागुंफा रोडवरील शिवाजी चौकातील रस्त्यालगत उभ्या केलेल्या तीन ते चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती़ या घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांनी परिसरातून धिंडही काढली होती़ म्हसरूळ पोलिसांनी दुचाकी जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

Web Title:  Four bikes were burnt to Makhmalabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.