चोरीच्या मारुतीसह चौघांना अटक

By Admin | Updated: November 10, 2015 23:18 IST2015-11-10T23:15:13+5:302015-11-10T23:18:13+5:30

चोरीच्या मारुतीसह चौघांना अटक

Four arrested along with the stolen Maruti | चोरीच्या मारुतीसह चौघांना अटक

चोरीच्या मारुतीसह चौघांना अटक

इंदिरानगर : रंगरेज मळ्यालगत वाहन चोरी करणारे दोन संशयित आणि दोन अल्पवयीन अशा चौघांना मुद्देमालासह गुन्हे शोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
मंगळवारी गुन्हे शोधक पथकाचे काकड, देशपांडे, भामरे व चव्हाण रात्री १२ वाजेच्या सुमारास रंगरेजमळा परिसरातून गस्त घालत होते. त्याचवेळी एमएमवाय ८0२0 हे वाहन त्यांना संशयास्पदरीत्या उभे दिसले. त्यामध्ये चार जण आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी दि. १ ते २ नोव्हेंबर दरम्यान रामेश्वर सोसायटीच्या संरक्षण भितीलगत उभी असलेली मारुती ८00 हे वाहन चोरल्याची कबुली दिली. आकाश नामदेव गंद (१९, रा. रंगरेज मळा), विशाल सुभाष चतुर्वेदी (२९, रा. राघव अपार्टमेंट, पांडवनगरी) आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. सदर संशयित आरोपीकडून आणखी काही वाहने मिळण्याची शक्यता आहे.
वृद्धाची आत्महत्त्या
दिंडोरीरोडवरील सम्राटनगरमध्ये राहणाऱ्या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) घडली़
मयत वृद्धाचे नाव दत्तू गोटीराम लहांगे (६०) असे आहे़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Four arrested along with the stolen Maruti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.