शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

साडेचार वर्षे आरोप-प्रत्यारोप, आता गळ्यात गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:47 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपावरून युती फिस्कटली आणि नंतर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला. नाशिकमध्येदेखील भाजपाला विरोधकांच्या मदतीने कोंडीत आणण्याची खेळी ज्या शिवसेनेने खेळली त्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१५) मात्र भाजपा कार्यालयात हजेरी लावली आणि तुझ्या गळा, माझ्या गळा असे गीत गात युती अभेद्य असल्याचे नारे लावले.

ठळक मुद्देभाजपा-सेनेची संयुक्त बैठक : मतभेद होते, मनभेद नसल्याचे केले दावे

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपावरून युती फिस्कटली आणि नंतर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला. नाशिकमध्येदेखीलभाजपाला विरोधकांच्या मदतीने कोंडीत आणण्याची खेळी ज्या शिवसेनेने खेळली त्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१५) मात्र भाजपा कार्यालयात हजेरी लावली आणि तुझ्या गळा, माझ्या गळा असे गीत गात युती अभेद्य असल्याचे नारे लावले.राजकारणात मित्रत्व आणि शत्रुत्व कायम राहत नसले तरी गेले साडेचार वर्षे राज्यात वेगळेच वातावरण होते. सत्तेत असूनही सतत भाजपाला शिवसेना लक्ष करीत होते. नाशिकमधील प्रकल्प विदर्भात पळविणे आणि नाशिकचे पाणी मराठवाड्याला देणे या विषयावरून शिवसेनेने भाजपाला जेरीस आणताना सरकारच्या विरोधात मोर्चाही काढला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण बदलले दोन्ही पक्षं पुन्हा एकत्र आले. नेतेच एकत्र आल्यानंतर स्थानिक पातळीवर काय होणार, शिवसेनेचे मंत्री आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १५) वसंत स्मृतीची पायरी चढली आणि युती झाली आता एकत्र आहोत असे दाखविले. आमच्यात मतभेद होते, परंतु मनभेद कधीही नव्हते असे सांगत उभयतांनी एकत्र राहण्याची पुन्हा एकदा ग्वाही दिली. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशामुळेएकत्र आल्याचेदेखील त्यांनी सांगितले.दरम्यान, ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे व हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी भाजपाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी आहेर तसेच आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, शिवसेनेचे आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे आदि यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना