वादळामुळे चार एकर द्राक्षबाग भुईसपाट

By Admin | Updated: January 20, 2017 00:32 IST2017-01-20T00:32:19+5:302017-01-20T00:32:30+5:30

वादळामुळे चार एकर द्राक्षबाग भुईसपाट

Four acres of grape grapes due to the storm | वादळामुळे चार एकर द्राक्षबाग भुईसपाट

वादळामुळे चार एकर द्राक्षबाग भुईसपाट

पांढुर्ली : सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात बुधवारी दुपारी आलेल्या वादळामुळे काढणीला आलेला सुमारे चार एकर निर्यातक्षम द्राक्षबाग भुईसपाट झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शिवडे येथील अशोक विठ्ठल हारक यांनी त्यांच्या गट नंबर ७५७/५ मध्ये सोनाका जातीच्या द्राक्षांची लागवड केली आहे. द्राक्षांचे चांगल्यापैकी उत्पादन येईल अशी अपेक्षा होती.
द्राक्षबागा काढणीवर आला होता. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळ आल्याने अ‍ॅँगल उन्मळून पडले. यात हारक
यांचे सुमारे ३० लाख रुपयांचे
नुकसान झाले असल्याचा पंचनामा कृषी सहायकांनी केला आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. (वार्ताहर)

Web Title: Four acres of grape grapes due to the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.