गोळीबारप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 9, 2017 00:25 IST2017-07-09T00:25:14+5:302017-07-09T00:25:29+5:30
नाशिकरोड : युवकावर झालेल्या गोळीबारप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळीबारप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : वडनेर गेटजवळील एल अॅन्ड टी कंपनीच्या जुन्या प्रीकास्ट यार्डजवळ युवकावर झालेल्या गोळीबारप्रकरणी चौघा जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून गोळीबाराचा बनाव रचला असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
आनंदनगर येथील तुलसी अपार्टमेंटमध्ये राहणारे शिवमीलन रामराज सिंग (४२) हे शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास फोर्ड फिगो कार (एमएच १५, डीसी २५३७) मधून पाथर्डी फाट्याकडून वडनेर गेटकडे येत होते. वडनेर गेट अलीकडील एल अॅन्ड टी च्या जुन्या प्रीकास्ट यार्डजवळ शिवमीलन यांच्या गाडीला दोन गाड्या आडव्या लावून गाडी अडविण्यात आली. त्या दोन गाड्यांमधून उतरलेल्या चौघा जणांनी शिवमीलन यांच्या कानफटीजवळ बंदूक लावली असता शिवमीलनने हाताने बंदुकीला झटका दिला. यावेळी उडालेली गोळी शिवमीलन यांच्या हाताच्या पंजात घुसली.