शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राज यांच्याकडून मनपाच्याच सत्तेसाठी पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:30 IST

शहरासाठी खूप कामे केली; परंतु नाशिककरांनी नाकारले आणि ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना मात्र भरभरून सत्ता दिली, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलेच; परंतु विधानसभा निवडणूक असताना महापालिकेतील कामांनाच उजाळा दिला आणि कितीही नाकारले तरी नाशिकवर माझे प्रेम आहे, असे सांगत पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीसाठी येईलच, असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देनिवडणूक विधानसभेची, मुद्दे मात्र मनसेच्या सत्ता काळातील

नाशिक : शहरासाठी खूप कामे केली; परंतु नाशिककरांनी नाकारले आणि ज्यांनी काहीच दिले नाही त्यांनामात्र भरभरून सत्ता दिली, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलेच; परंतु विधानसभा निवडणूक असताना महापालिकेतील कामांनाच उजाळा दिला आणि कितीही नाकारले तरी नाशिकवर माझे प्रेम आहे, असे सांगत पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीसाठी येईलच, असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला.२००९ मध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले आणि त्याहीपेक्षा मनसेची पहिली सत्ता २०१२ मध्ये नाशिक महापालिकेत आली. त्यावेळी न भूतो न भविष्यती अशी कामे केल्याचा राज यांचा दावा आहे. अनेक प्रकल्प सामाजिक दायित्व निधीतून करण्यात आले, असे अनेक दावे राज हे करतात.बुधवारी (दि.१६) नाशिकमधील सभेतदेखील त्यांनी तोच सूर आळवला. मात्र, इतकी कामे करून सत्ता मिळाली नाही. त्यामुळे नाशिककरांच्या मनात काय आहे तेच कळत नाही, असे सांगत त्यांनी अर्थात नाशिककरांवर माझे प्रेम आहे आणि मी पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी येईलच, असे सांगून त्यांचे लक्ष विधानसभेपेक्षा नाशिक महापालिकेवर अधिक असल्याचे दाखवून दिले किंबहुना राज यांनी या निवडणुकीसाठी आतापासूनच पायाभरणी केल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार असताना त्यांनी २००९ मध्ये निवडून आलेल्या मनसेच्या आमदारांनी काय कामे केली यापेक्षा महापालिकेच्या काळातील कामे सांगितल्याने त्यांचा कल महापालिकेकडेच अधिक असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणूक लढविली नाही. विधानसभा निवडणुकीत मोजक्याच जागा लढवत आहे; परंतु नाशिक महापालिकेत मात्र पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे त्यांनी दर्शवून दिले.ढिकले यांना अनुल्लेखाने मारले..राज ठाकरे यांनी अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडे पक्षाची स्थानिक सूत्रे दिली होती. मात्र, त्यानंतर ते निवडणूक येताच भाजपत दाखल झाले; परंतु राज यांनी त्यांचा फारसा समाचार न घेता बुधवारी झालेल्या सभेत दुर्लक्ष केले. काही लोक सत्तेच्या मागे जातात, गुळामागे मुंगळे जातात तसे ते गेले एवढाच एक उल्लेख करून पुढे महत्त्व दिले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNashikनाशिक