गिरीश जोशीमनमाड : येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाच्या बांधकामाची कोनशिला ७५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबर १९४५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बसवण्यात आली होती. महामानवाच्या हस्ते झालेल्या ज्ञानदानाच्या पायाभरणीमुळे आजपर्यंत अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत.दि ९ डिसेंबर १९४५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनमाड शहरात आगमन झाले होते. रेल्वेस्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. गगनभेदी घोषणांनी रेल्वेस्थानक दुमदुमून गेले होते. स्थानकावरून निघालेली त्यांची मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून घोषणा देत नियोजित बोर्डिंगच्या जागेवर पोहोचली. या ठिकाणी भाषण झाल्यावर डॉ. आंबेडकरांच्या हस्ते विद्यार्थी आश्रमाच्या इमारतीची कोणशिला बसवण्यात आली. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इमारतीच्या कार्यक्रमाच्या आठवणींना आज ७५ वर्षांनंतरसुद्धा मनमाडकर मोठ्या अभिमानाने उजाळा देत असल्याचे दिसून येते.मनमाड पालिकेकडून डॉ. बाबासाहेबांना मानपत्र.....मनमाड नगरपालिकेने ९ डिसेंबर १९४५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानपत्र देऊन गौरव केला होता. तत्कालीन नगराध्यक्ष तुकाराम सोनवणे, उपाध्यक्ष निंबाजी पगारे, नगरसेवक माधव सप्रे, राहिमखा कारीमखा, मुरलीधर गुजराथी, सुगंधचंद मोतीराम, व्ही. बी. दराडे, एस. टी. बारसे, टी. डी. उबाळे, एस. के. केदारी, सोभाचांद बिरदीचंद, फरदुमजी कावसजी, मिसेस डोंगरे यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते.दलित समाजाला समानतेचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी आपण सुरू केलेल्या लढ्याला व आपल्या महत्कार्याला आमची नगरपालिका शक्य तो हातभार लावत असल्याचे या मानपत्रात नमूद करण्यात आले होते.
महामानवाच्या हस्ते ७५ वर्षांपूर्वी झाली ज्ञानदानाची पायाभरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:54 IST
मनमाड : येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाच्या बांधकामाची कोनशिला ७५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबर १९४५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बसवण्यात आली होती. महामानवाच्या हस्ते झालेल्या ज्ञानदानाच्या पायाभरणीमुळे आजपर्यंत अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत.
महामानवाच्या हस्ते ७५ वर्षांपूर्वी झाली ज्ञानदानाची पायाभरणी!
ठळक मुद्देमनमाड : आंबेडकर विद्यार्थी आश्रमामुळे उघडली शिक्षणाची कवाडे